सांगली-मिरज-कुपवाडमध्ये काँग्रेसचा झेंडा

सत्तारुढ काँग्रेस आणि राष्ट्रवादीसाठी प्रतिष्ठेच्या ठरलेल्या सांगली-मिरज-कुपवाड महापालिका निकालांमध्ये काँग्रेसनं सुरवातीला आघाडी घेतलीय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jul 8, 2013, 07:26 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, सांगली
सत्तारुढ काँग्रेस -राष्ट्रवादीसाठी प्रतिष्ठेची ठरलेल्या सांगली मिरज कुपवाड महापालिकेवर काँग्रेसचे सत्ता येणार हे स्पष्ट झालंय.
काँग्रेसनं ७८ पैकी ४० जागांवर विजय मिळवलाय. तर जयंत पाटील यांच्या नेतृत्तवाखालील राष्ट्रवादी काँग्रेसनं केवळ १८ जागीच विजय मिळवलाय. स्वाभिमानी विकास आघाडीनं ८ तर ९ जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झालाय. तर मनसेने १ जागेवर विजय मिळविला आहे.
या निवडणुकीत काँग्रेसची सुत्रे मदन पाटील यांच्याकडे तर राष्ट्रवादीची सूत्रे ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांच्याकडे होती. राज्यात सत्तेत असलेल्या काँग्रेस आघाडीत या निवडणुकीच्या निमित्तानं चांगलाच कलगीतुरा रंगला होता.
ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांच्यासाठी ही प्रतिष्ठेची निवडणूक होती. मात्र या निवडणुकीत राष्ट्रवादीचा पराभव झाल्यानं जयंत पाटील यांना धक्का बसलाय. तर मदन पाटिल यांच महापालिकेवरील वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झालंय.

अपडेट
१.३०- अंतिम आकडेवारी- काँग्रेस ४०, राष्ट्रवादी- १८, विकास आघाडी- ८, अपक्ष- ९, मनसे-१
१. ०० वाजता- काँग्रेसचा ४० जागांवर विजय
१२.४५ वाजता- सांगली मनपावर काँग्रेसचा झेंडा
१२.३० वाजता - काँग्रेस ३९ जागांवर विजयी, राष्ट्रवादीला ११ जागा, स्वाभिमानी विकास आघाडी ७ जागा, मनसे १ जागा विजयी
१२.२० वाजता- काँग्रेस मॅजिक फिगरपासून चार पावलं दूर
१२. १५ वाजता - काँग्रेस २० जागांवर विजयी, राष्ट्रवादी ८ जागांवर विजयी, स्वाभिमानी विकास आघाडी २ जागांवर विजय
११.१५ वाजता - काँग्रेस ३०, राष्ट्रवादी ८, स्वाभिमानी विकास आघाडीचे उमेदवार ७ जागांवर आघाडी
११.१० वाजता – प्राथमिक मतमोजणीत आघाडीवर, काँग्रेस २२ ,राष्ट्रवादी ७,स्वाभिमानी विकास आघाडी ७ जागांवर आघाडी
१०.४५ वाजता - सांगली मनपा निवडणूक- काँग्रेसला २२ जागांवर आघाडी
१०.३० वाजता - सांगली मनपा निवडणूक : सुरवातीच्या मतमोजणीत काँग्रेस आघाडीवर, काँग्रेस १७, राष्ट्रवादी ७, ,स्वाभिमानी विकास आघाडी ७ जागांवर आघाडी

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.