www.24taas.com, झी मीडिया, पुणे
संजय दत्तच्या विरोधात आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. येरवडा तुरुंगाबाहेर निदर्शने करण्यात आली. संजय दत्तच्या शिक्षेवर आक्षेप घेत निदर्शने करण्यात आली. संजय दत्तला झुकतं माप का? असा सवाल करण्यात येतोय. दरम्यान, न्यू ईयर पार्टी संजूबाबाला आपल्या घरी करता येणार आहे.
अभिनेता संजय दत्त पुन्हा एकदा तुरूंगाबाहेर येणार आहे. पुण्याच्या विभागीय आयुक्तांनी त्याला ३० दिवसांचा पॅरोल मंजूर केलाय. संजयची पत्नी मान्यताची प्रकृती ठिक नसल्यामुळे त्याला पॅरोल देण्यात आलाय. संजय आज येरवडा तुरुंगाबाहेर येईल. त्यामुळे आता ख्रिसमस आणि न्यू ईयर पार्टी संजूबाबाला आपल्या घरी करता येईल. दरम्यान, येरवडा तुरुंगाबाहेर संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी संजय दत्तच्या विरोधात निदर्शने केली.
संजयला ३० दिवसांचा पॅरोल मिळाला असला तरी फर्लोप्रमाणे ही रजादेखील वाढवता येते. त्यामुळे त्याला आताही एकूण २ महिने घरी राहता येऊ शकतं. एकूणच त्याचा प्रवास शिक्षामाफीच्या दिशेनं सुरू आहे का, असा प्रश्न आता उपस्थित होतोय. पत्नी मान्यताची तब्येत बरी नसल्याच्या कारणावरुन संजय दत्तला ३० दिवसाची पॅरोलची रजा मंजूर झालीय.. मात्र मान्यता गुरुवारी आर. राजकुमारच्या स्क्रीनिंगला हजर होती.स्क्रीनिंगला राहणारी मान्यता अचानक आजारी कशी पडली असा प्रश्न यामुळं निर्माण झालाय..
संजय दत्तच्या पॅरोलवर विविध स्तरातून टीका होतेय. त्यातच आता स्वतः गृहमंत्री आर आर पाटील यांनी या पॅरोलची चौकशी करण्याचे आदेश दिलेत. हे आदेश कोणी दिले याची चौकशी करून त्यासंबंधीचं निवेदन विधानसभेत हिवाळी अधिवेशनात देण्यात येईल असं गृहमंत्री आर आर पाटील यांनी म्हटलंय. पॅरोल संबंधीचे आदेश महसूल विभागाकडून दिले जातात. त्या आदेशांची चौकशी करण्यात येईल असं गृहमंत्र्यांनी स्पष्ट केलंय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.