www.24taas.com, झी मीडिया, पुणे
बॉलिवूड अभिनेता संजय दत्त सध्या येरवडा कारागृहात शिक्षा भोगत असताना कारागृहातील पोलीस त्याला रम आणि बिअर पाजत आहे, असा घणाघाती आरोप भाजपचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी केला आहे. विनोद तावडे यांनी शुक्रवारी म्हटलं की, बॉलिवूड अभिनेता संजय दत्तला पुण्याच्या येरावडा कारागृहात रम आणि बिअर देण्यात येतेय आणि ते पोहचवण्यात काही पोलीस अधिकारी त्याला मदत करत आहे. संजय दत्तला १९९३च्या मुंबई बॉम्बस्फोटाच्या आरोपाखाली पाच वर्षाची शिक्षा सुनवण्यात आली आहे.
महाराष्ट्र विधान परिषदच्या कलम २६०च्या अंतर्गत महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी आपल्या एक तासाच्या वक्तव्यात सांगितलं की, कारागृहात शिक्षा भोगणाऱ्या आरोपींवर नजर ठेवण्यात येते. मात्र कारागृहातल्या पोलिसांबरोबर साटलोटं केल्यानंतर संजय दत्त आणि शक्ती मिलमधल्या आरोपींना व्हिआयपी सुविधा देण्यात येतेय. गुन्हा केल्यानंतर ही ९३ टक्के गुन्हेगार मोकाटपणे फिरत आहे आणि पोलिसांच्या कारागृहामध्ये राहणारे कैदी बलात्कार आणि अत्याचार सारख्या घटना करणारे आरोपी आहे हे सिद्ध झालेले आहे.
राज्य सरकारवर टिका करताना तावडे म्हणाले की, महाराष्ट्रात ऑक्टोबर महिन्यामध्ये २१६ बलात्काराच्या घटना होणं खूप चिंताजनक गोष्ट आहे. अशा परिस्थितीत महिलांची सुरक्षा लक्षात घेऊन प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये महिलांची सुरक्षा ऑडिट होणं गरजेचं आहे. राज्यातले बाल निवासगृह भ्रष्टाचाराचे अड्डे बनवण्यात आले आहेत. तसंच महिलांच्या विरोधात दिवसेंदिवस गुन्हे वाढत आहेत. वर्ष २०११मध्ये महिलांच्या विरोधात १,७०१ गुन्हे पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आले होते. तेच २०१२मध्ये वाढून १,८०० झाले आहेत.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.