www.24taas.com, झी मीडिया, बारामती
बारामती तालुक्यातील मोरगाव - जेजुरी रोडवरील आंबी ब्रुद्रुक गावाच्या नजीक अज्ञात वाहण्याच्या धडकेने एका हरणाचा मृत्यू झालाय, तर काही वेळेत याच परिसरातील जोगवडी गावात एक चिंकारा जातीचे हरीण मृत अवस्थेत शेतकऱ्यांना आढळून आला या दोन्ही घटनांनमुळे बारामती परिसरात वनविभागाच्या गलथान कारभारामुळे खळबळ उडाली आहे.
या भागात बऱ्याच वेळा हरिणाची शिकार झाल्याचे आढळून आलेय, राज्याचे माजी मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी याच भागातील चिंकाराची शिकार केली होती, त्यांना मंत्री पदावरून या प्रकरणामुळे पायउतार व्हावे लागले होते, या शिकार प्रकरणाचा खटला सासवड न्यायालयात अजूनही सुरु आहे.
उन्हाळ्याची वाढू लागल्याने वन क्षेत्रातील अनेक पशु पक्षी मानवी वस्तीकडे अन्न पाण्याच्या शोधत धाव घेऊ लागले आहेत.
या परिसरातील वनीकरमधील प्राण्याच्या पिण्याच्या पाण्याच्या टाक्या नेहमीच उन्हाळ्यामध्ये कोरड्या पडलेल्या असतात, या भागात चिंकाराचे प्रमाण जास्त आहे. पाण्याच्या शोधत वनवन भटकती करत असतांना मुक्या प्राण्यांना आपला जीव गमवावा लागत आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.