www.24taas.com, झी मीडिया, पुणे
पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील टाकळीहाजी इथं दोन वर्षाचा मुलगा बोअरवेलमध्ये पडला. शुभम मोरे असं या चिमुकल्याचं नाव आहे. एका शेतात शुभमचे वडील ऊसतोडणीसाठी आले होते. त्याचवेळी खेळता खेळता शुभम शेतातल्या दीडशे ते दोनशे फूट खोल उघड्या बोअरवेलमध्ये पडला.
या घटनेनंतर शुभमला जेसीबीच्या मदतीने बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु झालेत.. बोअरवेलमध्ये ऑक्सिजन पुरवठा करण्यात आला. घटनास्थळी शिरुरचे पीएसआय, कर्मचारी, तहसीलदार यांनी धाव घेतली.
पुण्याहून आपत्कालीन व्यवस्थापनाचे जवानदेखील घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने शुभमला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. बोअरवेलमध्ये पडल्यानंतर काही वेळ त्याच्या रडण्याचा आवाज ऐकू येत होता. दरम्यान जी ऊसतोड सुरु होती ती नगर जिल्ह्यातील अंबालिका साखर कारखान्याची होती.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.