मनसेच्या चार कार्यकर्त्यांना मुंबईत अटक

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अहमदनगर दौऱ्याच्यावेळी त्यांच्या ताफ्यावर दगडफेक झाली होती. याचे पडसाद मुंबईतही उमटले होते. तोडफोड केल्याप्रकरणी मनसेच्या चार कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. यामध्ये मनसेच्या विभागप्रमुखाचा समावेश आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Mar 7, 2013, 01:04 PM IST

www.24taas.com,मुंबई
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अहमदनगर दौऱ्याच्यावेळी त्यांच्या ताफ्यावर दगडफेक झाली होती. याचे पडसाद मुंबईतही उमटले होते. तोडफोड केल्याप्रकरणी मनसेच्या चार कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. यामध्ये मनसेच्या विभागप्रमुखाचा समावेश आहे.
मुंबईतील सायन कोळीवाड्यातील जीटीबीनगर येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयाची तोडफोड करण्यात आली होती. सायन कोळीवाड्याचे मनसे विभागप्रमुख बाबा कदम यांच्यासह चार कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. तसेच यामध्ये वॉर्ड क्र. १६८चे शाखाध्यक्ष राजाराम हिनुकले, मधुसुदन रणदिवे, उपशाखाध्यक्ष गोला ओबेरॉय आणि मनसे विद्यार्थी सेनेचे १६८चे वार्ड अध्यक्ष देवेंद्र बिस्ट यांनाही अटक करण्यात आलीय.

राज यांच्या ताफ्यावर अहमदनगर जिल्ह्यात दगडफेक झाल्याच्या घटनेचे पडसाद राज्यात उमटले होते. अनेक ठिकाणी मनसेच्या कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला होता. कार्यालयाची तोडफोड केल्याप्रकरणी राष्ट्रवादी पक्षाचे वॉर्ड अध्यक्ष इंदरपालसिंग मारवा यांनी पोलिसांत तक्रार केली होती. मात्र, ही तोडफोड मनसे कार्यकर्त्यांनी केली नसल्याचे मारवा यांनी स्पष्ट केले होते. आपल्याला अनेक दिवसांपासून धमक्यांचे फोन करणार्याक विकासकाची तक्रार असल्याचे त्यांचे म्हणणे होते.
कार्यालयाचे तोडफोड केल्याप्रकणी पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेर्याणमधून मिळालेल्या छायाचित्रातून मनसेच्या कार्यकर्त्यांची ओळख पटली. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. दरम्यान, कुर्ला न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांची जामिनावर मुक्तता करण्यात आलीय.