www.24taas.com, मुंबई
मनसेनं निवासी सोसायट्यांचे बोर्ड मराठीमध्ये लिहिण्याची मागणी केलीये. याबाबत त्यांनी मुंबई महानगरपालिकेला एक प्रस्तावही दिलाय. मात्र, हाऊसिंग सोसायटी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी या मागणीवरुन नाराजी व्यक्त केलीय.
मुंबईत मनसेनं आपल्या मराठीच्या मुद्याला पुन्हा एकदा हात घातलाय. यावेळी त्यांनी लक्ष्य केलंय हाऊसिंग सोयायट्यांना... पक्षानं मुंबईत काही वर्षांपूर्वी दुकानदारांना मराठी भाषेतल्या पाट्या लावण्यासाठी भाग पाडलं होतं. आता हाऊसिंग सोयायट्यांच्या पाट्या मराठीत असाव्यात अशी मागणी केलीय. याप्रकरणी मनसेनं महापालिकेला एक प्रस्ताव दिलाय.
मुंबई आणि परिसरात हजारो हाऊसिंग सोसायट्या आहेत. दक्षिण मुंबईचा विचार केला तर इथल्या अनेक सोसायट्यांच्या पाट्या या इंग्रजीत आहेत. कफ परेड रहिवाशी संघटनेनं मनसेची ही मागणी अनावश्यक असल्याचं म्हटलंय.
मराठी पाट्यांच्या मुद्यावरुन मनसेनं मनपाकडे दिलेल्या प्रस्तावामुळे सत्ताधारी शिवसेनेपुढे मात्र अडचणी निर्माण झाल्यात. प्रशासन आता यावर काय निर्णय घेते याकडं अनेकांचं लक्ष आहे.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.