www.24taas.com, अमरावती
अमरावती येथे आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर सभेत विरोधकांना चांगलंच फैलावर घेतलं. सिंचनाचं पाणी इंडियाबुल्सला देऊ नका असं सभेपूर्वीच राज ठाकरेंनी स्पष्ट केलं होतं.
राज ठाकरेंच्या दौऱ्याचा तिसरा टप्पा पूर्ण
गेली ३० वर्षं महाराष्ट्रात फिरतोय मी| ऊन्ह- पाऊस पाहिला नाही|
काल अंबामातेचं दर्शन घेतलं, आज तुमचं- राज
पोलिसांवर हात उचलायचा नाही
काल अंबामातेचं दर्शन घेतलं, आज तुमचं- राज|
पोलिसांवर हात उचलायचा नाही, माझा आमदार असला तरीही गय केली जाणार नाही- राज|
माझ्या आमदरावरही कारवाई करा - राज ठाकरे|
उद्या न्यायाधिशांवरही हात उचलाल- राज|
पाच आमदार निलंबित केलंत, तर केसेस फक्त दोघांवरच का?- राज|
अर्थसंकल्पाला विरोध होऊ नये, म्हणून NCP-काँग्रेसच्या आमदारांचं निलंबन मागे घेतलं- राज|
राज ठाकरेंनी दाखवले सिंचन घोटाळ्याचे पुरावे|
सत्ताधारी निगरगट्ट, गेंड्यांच्या कातडीचे- राज |
मर्यादा येत असतील, तर कशाला केलीत आघाडी?- राज ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल|
सध्या माझे शब्द मुख्यमंत्र्यांना खूप बोचतात-राज|
सिंचन प्रकल्पांचा खर्च वाढला कसा?- राज|
इतकी वर्षं सरकार काय करत होतं- राज|
राज्याचा डोलारा संभाळणारी खाती राष्ट्रवादी काँग्रेसकडे- राज|
अजित पवार, ७० हजार कोटी रुपये गेले कुठे- राज ठाकरे|
सत्ताधाऱ्यांना बाहेर रस्त्यांवर नागडं करून मारलं पाहिजे- राज|
निवडून देणाऱ्यांनी विचार करायला हवा- राज|
सिंचनाचा निधी गेला कुठे?- राज |
सर्व कंत्राटं परराज्यांत- राज|
अजित पवार नियामक मंडळांना विचारातच घेत नाहीत- राज|
जर तुमच्या तोंडचं पाणी, शेतीचं पाणी `इंडियाबुल्स`ला जात असेल, तर त्याविरोधात उद्या आंदोलन झालंच पाहिजे- राज|
तुम्हालाच भाव देत नाही, तुमच्या पिकांना काय भाव देणार- राज|
तोंडचं पाणी पळवणारे प्रकल्प नकोत- राज|
परप्रांतियांमुळे स्थानिक लोकांना नोकऱ्या नाही- राज|
जनता विचारत नाहीत, म्हणून हे उद्योग- राज|
पोलीस दिवसभर किती राबतो याची आपल्याला कधीच कल्पना येत नाही- राज|
एखादा पोलीस वेडा निघाला, म्हणून सबंध खातं तसंच नसतं- राज|
शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं, मुलींना पळवून नेण्याचं प्रमाण वाढलंय- राज|
जनतेचा हक्कभंग कुणी केला? अजित पवार उत्तर द्या- राज |
विदर्भाच्या विकासासाठी रतन टाटांशी बोललो- राज ठाकरे|
वाघ मारून नव्हे, तर पर्यटकांना वाघ दाखवून पैसे मिळवा- राज|
राज ठाकरे एक पर्याय म्हणून उभा आहे, त्याचा स्वीकार करा- राज ठाकरे|
सत्ताधाऱ्यांकडे एकच शस्त्र आहे, जातीयवादाचं- राज|
जाती पातीच्या नावावर सत्ताधारी तुम्हाला लढवतात, आरक्षणाच्या नावाखाली भूलवतात, त्यांना भूलू नका- राज|
महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात मला गोशाळा सुरू करायची आहे- राज|
जग कुठे चाललंय आणि महाराष्ट्र कुठे चाललाय हे पाहावत नाही, म्हणून हा पक्ष स्थापन केला आहे- राज ठाकरे|
राज ठाकरे एक पर्याय म्हणून उभा आहे, त्याचा स्वीकार करा- राज ठाकरे|