आजही दिवेआगर गणपतीच्या प्रतिक्षेत

रायगड जिल्ह्यातील दिवेआगर सुवर्णगणेश मंदिरावरती पडलेल्य़ा दरोड्याच्या घटनेला आज एक वर्ष पूर्ण झालं आहे. या वर्षभरात ना देव देव्हाऱ्यात आला ना मंदिर उभ राहू शकलं आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Mar 24, 2013, 06:52 PM IST

www.24taas.com, दिवेआगर
रायगड जिल्ह्यातील दिवेआगर सुवर्णगणेश मंदिरावरती पडलेल्य़ा दरोड्याच्या घटनेला आज एक वर्ष पूर्ण झालं आहे. या वर्षभरात ना देव देव्हाऱ्यात आला ना मंदिर उभ राहू शकलं आहे.
राज्य सरकारनं अनेक आश्वासनांची बरसात केली मात्र देव, देऊळ सोडा पण ज्या दोन पहारेक-यांनी या दरोड्यामध्ये आपले प्राण गमावले. त्या पहारेक-याच्या कुटुंबियानाही सरकारने उपेक्षित ठेवलं. केवळ एवढचं नाही तर राज्य सरकारच्या वतीनं त्यावेळी जनक्षोभ ओळखून भरघोस मदतीची आणि मंदिर मूर्ती स्थापनेची घोषणाही करण्यात आली होती.

पण नंतर मात्र सारंच हवेतच विरलं आहे. सरकारच्या उदासिनतेमुळे गावक-यांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण आहे. गणपती मूर्ती नसल्यामुळे दिवेआगर गावाचं वैभव नष्ट झालं आहे. मूर्ती पाहाण्यासाठी येत असणाऱ्या पर्यटकांच्या आणि भक्तांच्या संख्येतही बराच फरक पडला आहे.