भाजपा `वन मॅन पार्टी`च्या दिशेने - अडवाणी

भाजप हा पक्ष वन मॅन पार्टीच्या दिशेने जात असल्याचं भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, यांनी नरेंद्र मोदी यांचं नाव न घेता म्हटलं आहे.

Updated: Mar 5, 2014, 07:33 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
भाजप हा पक्ष वन मॅन पार्टीच्या दिशेने जात असल्याचं भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, यांनी नरेंद्र मोदी यांचं नाव न घेता म्हटलं आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दिल्लीत एका सभेत लालकृष्ण अडवाणी यांनी दिल्लीत ज्येष्ठ नेत्यांशी बोलतांना सांगितलं, भाजप हा पक्ष वन मॅन पार्टीच्या दिशेने जातोय.
तसेच हे राहुल गांधी यांनी यापूर्वी म्हटलं आहे, आणि आपण याच्याशी सहमत आहोत, की पक्षावर एका नेत्याचं प्रभुत्व आलं आहे.
या बैठकीत नरेंद्र मोदी, राजनाथ सिंह आणि अडवाणी यांच्यासोबत काही निवडक ज्येष्ठ नेते उपस्थित होते.
उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यावर चर्चा सुरू होती, आणि मोदी आणि अडवाणी जवळृजवळ बसले होते.
तेव्हा अडवाणींनी पक्ष वन मॅन पार्टीच्या दिशेने जात असल्याचं सांगितलं आणि सर्व नेत्यांची अवस्था बैठकीत अवघडल्यासारखी झाली.
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी भाजपला वन मॅन पार्टी म्हणतात.
वन मॅन पार्टी या शब्दांच्या माध्यमातून नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला जातो आणि राजकीय पटलावर ही टीका होते की, भाजप फक्त नरेंद्र मोदी यांच्यावरच केंद्रीत झाली आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.