केजरीवालांच्या पत्रकार परिषदेत गोंधळ, मारहाण

इंडिया अगेन्‍स्‍ट करप्‍शनचे प्रमुख आणि सामाजिक कार्यकर्ते अरविंद केजरीवाल यांच्या पत्रकार परिषदेत प्रचंड गोधंळ घालण्याचा प्रयत्न केला गेला.

Updated: Oct 31, 2012, 05:29 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली
इंडिया अगेन्‍स्‍ट करप्‍शनचे प्रमुख आणि सामाजिक कार्यकर्ते अरविंद केजरीवाल यांच्या पत्रकार परिषदेत प्रचंड गोधंळ घालण्याचा प्रयत्न केला गेला. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पत्रकारांचे कॅमेरे हिसकवण्याचा प्रयत्न केला. त्याचसोबत काहीजणांना मारहाण करण्यात आली. केजरीवाल यांच्या पत्रकार परिषदेत प्रचंड गोंधळ उडविण्यात आला. केजरीवालांची पत्रकार परिषद थांबविण्याचा केला प्रयत्न करण्यात येत होता. या पत्रकार परिषदेत जोरदार मारहाण करण्यात आली.
पत्रकार परिषद थांबविण्यासाठी केजरीवाल यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला जात होता. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पत्रकारांनाही मारहाण केली. ह्या माराहाणीनंतर केजरीवाल यांनी सांगितले की, हा गोंधळ होणार हे अपेक्षितच होतं, नवी दिल्लीतील कार्यकर्ता जगदीश शर्मा यांनी केजरीवाल यांच्या पत्रकार परिषदेत गोंधळ घातला. आमच्या देवासमान पंतप्रधानांवर गलिच्छ आरोप केल्यानेच आम्ही पत्रकार परिषदेत गोंधळ घातल्याचे काँग्रेस कार्यकर्ताने मान्य केले.
काँग्रेसचे चार कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषदेत प्रचंड गोंधळ घातला. केजरीवाल यांच्यावर चप्पल फेकण्याचा प्रयत्न केला गेला. त्यामुळे तेथे हाणामारी झाली. त्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करून चारही जणांना ताब्यात घेतल्याचे समजते.