सिंचन घोटाळ्यात भाजप-काँग्रेसचं साटंलोटं

अरविंद केजरीवाल यांनी आज आणखी एक नवा गौप्यस्फोट केलाय..वडेरा आणि खुर्शिदनंतर त्यांनी आज भाजप अध्यक्ष नितीन गडकरी यांच्यावर हल्लाबोल केलाय.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Oct 18, 2012, 07:50 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली
अरविंद केजरीवाल यांनी आज आणखी एक नवा गौप्यस्फोट केलाय..वडेरा आणि खुर्शिदनंतर त्यांनी आज भाजप अध्यक्ष नितीन गडकरी यांच्यावर हल्लाबोल केलाय.
गडकरी यांचे सत्ताधा-यांशी साटंलोटं असून त्यांचे शरद पवारांशी व्यावसायिक संबंध असल्याचा घणाघात केलाय. विदर्भात अनेक ठिकाणी त्यांनी तत्कालीन जलसंपदामंत्री अजितदादांशी संगनमत करून शेतक-यांच्या जमिनी लाटल्याचा आरोपही केलाय.
धरणासाठी घेतलेल्या जमिनी शिल्लक राहिल्यानंतर त्या शेतक-यांना परत करण्याऐवजी अजितदादांनी तात़डीनं कार्यवाही करत गडकरी आणि जेम्स ऑफ इंडियाला ही जमीन दिल्याचं केजरीवालांचं म्हणणय. गडकरींनी आपल्या उद्योगांच्या वाढीसाठी सत्ताधा-यांशी सेटींग करून शेतकरांच्या जमीनी आणि पाणी पळवल्याचा गंभीर आरोपही करण्यात आलाय. तर गडकरींवरील सर्व आरोप भाजपनं फेटाळून लावले आहेत.
अंजली दमानियांच्या नादी लागून केजरीवालांनी आरोप करू नये असा सल्ला भाजपनं दिलाय. तर सर्व कार्यवाही नियमानुसारच झाल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलीय.