केजरीवाल यांचे गांधींच्या जावयावर गंभीर आरोप

अरविंद केजरीवाल यांनी आयोजित केलेल्या आजच्या पत्रकार परिषदेत सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वढेरा यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. DLF आणि वढेरांमध्ये साटंलोटं असल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Oct 6, 2012, 03:53 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली
अरविंद केजरीवाल यांनी आयोजित केलेल्या आजच्या पत्रकार परिषदेत सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वढेरा यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. DLF आणि वढेरांमध्ये साटंलोटं असल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला आहे.
डीएलएफने ५ कोटींची मालमत्ता ३५ कोटींना विकली- केजरीवाल
रॉबर्ट वढेरांनी ३०० कोटी रुपयांची मालमत्ता बनवली- केजरीवाल
DLFने वढेरांना स्वस्तात मालमत्ता विकली- प्रशांत भूषण
DLF ने वढेरांना ६५ कोटींचं कर्ज दिलं- प्रशांत भूषण
DLFने वढेरांना बिनव्याज पैशाचा पुरवठा का केला? - प्रशांत भूषण
सोनिया गांधींचे जावई आहेत म्हणून रॉबर्ट वढेरांनी वाट्टेल ते करावं का?- शांती भूषण
वढेरांनी ५० लाखांत ३०० कोटींची जमीन मिळवली| २००७ ते २०१० य ३ वर्षांत जमवली एवढी संपत्ती -केजरीवाल
वढेरांनी जमवलेला काळा पैसा काँग्रेसचा?- केजरीवाल
रॉबर्ट वढेरा आणि त्यांच्या आईकडे ५ कंपन्यांची मालकी- केजरीवाल
हरियाणा आणि दिल्ली सरकारने DLF ला जमिनी दिल्या- केजरीवाल
वढेरांच्या मालमत्तेची कसून चौकशी करा- केजरीवाल

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x