मुंबई इंडियन्स फायनलला; सचिनच्या ५० हजार धावा पूर्ण

काल दिल्लीत झालेल्या उपांत्य सामन्यात मुंबई इंडियन्सच्या संघाने त्रिनिदाद टोबॅगो संघावर सहा विकेट्स आणि पाच चेंडू राखून विजय मिळवला.

Updated: Oct 6, 2013, 10:57 AM IST

www.24taas.com, वृत्तसंस्था, नवी दिल्ली
काल दिल्लीत झालेल्या उपांत्य सामन्यात मुंबई इंडियन्सच्या संघाने त्रिनिदाद टोबॅगो संघावर सहा विकेट्स आणि पाच चेंडू राखून विजय मिळवला.
उपांत्य फेरीच्या या सामन्यात मुंबई इंडियन्स समोर १५४ धावांचं लक्ष्य त्रिनिदादच्या संघाने ठेवलं होतं. त्याचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सला ९० धावांची भक्कम सलामी मिळाल्याने हे आव्हान सहज पार केले.
ड्वेन स्मिथने ५९, सचिन तेंडुलकरने ३५, तर कर्णधार रोहित शर्माने २५ धावा केल्या. दिनेश कार्तिकने नाबाद ३३ धावांची खेळी करून मुंबई इंडियन्सच्या विजयावर शिक्कमोर्तब केले.
मास्टर-ब्लासटर सचिनने आपल्या कारकिर्दीतील पन्नास हजार धावा या सामन्यात पूर्ण केल्या. हे या सामन्याचे खास वैशिष्ट्य ठरले. अशी कामगिरी करणारा सचिन पहिला आशियाई खेळाडू आहे.
त्याआधी एविन लुईसने ६२ धावा आणि यानिक ओटलेच्या नाबाद ४१ धावांच्या खेळीमुळे त्रिनिदाद अँड टोबॅगोने निर्धारीत २० षटकांत ५ गड्यांच्या मोबदल्यात १५३ धावांपर्यंत मजल मारली.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.