सचिनवर गुरू आचरेकरसर नाराज

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या वन-डे क्रिकेटमधून निवृत्तीच्या निर्णयावर त्यांचे गुरु रमाकांत आचरेकर यांनी नराजी व्यक्त केलीय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Dec 24, 2012, 10:17 AM IST

www.24taas.com,मुंबई
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या वन-डे क्रिकेटमधून निवृत्तीच्या निर्णयावर त्यांचे गुरु रमाकांत आचरेकर यांनी नराजी व्यक्त केलीय.
सचिनने घेतलेला निर्णय़ योग्य नसल्याचं मत सर रमाकांत आचरेकर यांनी म्हटलंय. सचिनने सतत खेळत राहावं अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केलीय.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही सचिन तेंडुलकरनं भारतीय क्रिकेटला दिलेल्या योगदानाचा गौरव केलाय. सचिनमुळं नव्या पिढीला प्रेरणा मिळणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

सचिननं वनडेला अलविदा केल्यानंतर त्याला भारतरत्न मिळावा ही मागणी जोर धरु लागलीय.याबाबत केंद्राकडं आग्रह धरणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय.
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या वनडे मधल्या निवृत्तीच्या घोषणेमुळं नागपूरमधल्या त्याच्या फॅन्सला धक्का बसलाय. काहींना त्याचा हा निर्णय मान्य नाही, तर काहींना बीसीसीआयचा सचिनवर दबाव असल्याचं म्हणणं आहे.