निवृत्तीचा निर्णयः सचिन रात्रभर झोपला नव्हता

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला एक दिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय अतिशय अवघड होता. त्याच्यामध्ये आणखी क्रिकेट शिल्लक आहे, त्याला आणखी काही काळ खेळायचे होते.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Dec 23, 2012, 04:44 PM IST

www.24taas.com, मुंबई
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला एक दिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय अतिशय अवघड होता. हा निर्णय घेण्यापूर्वी तो संपूर्ण रात्र झोपला नाही. त्याच्यामध्ये आणखी क्रिकेट शिल्लक आहे, त्याला आणखी काही काळ खेळायचे होते. परंतु, सतत होत असलेल्या टीकेमुळे व्यथित होऊन सचिनने निवृत्तीचा घेण्याचा निर्णय घेतला, असल्याची माहिती सचिनच्या निकटवर्तीयांनी दिली आहे.

सचिनच्या निवृत्तीमुळे वन डे क्रिकेटमधील एका युगाचा अस्ता झाला. सचिनचा निवृत्तीचा निर्णय सर्वांसाठी आश्चचर्याचा धक्काच होता. यावर सर्व प्रकारच्यात प्रतिक्रीया उमटत आहेत. परंतु, स्वतः सचिनसाठी हा निर्णय अतिशय अवघड होता. निर्णय कळविण्यापूर्वी तो कालची संपूर्ण रात्र जागा होता. एका क्षणासाठीही त्यापला झोप लागली नव्हती, असे त्याच्या निकटवर्तीयांनी सांगितले. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन गेल्या महिनाभरापासून त्याचा मोठा भाऊ अजित, पत्नी अंजली आणि त्याच्या प्रशिक्षकांशी चर्चा करीत होता.
सचिनने बीसीसीआयला निर्णय कळविला. त्यावेळी बीसीसीआयने सचिनला फेरविचार करावा, असे सांगितले होते. सचिनने पाकिस्तानविरुद्ध मालिकेत खेळावे, अशी इच्छा बीसीसीआयने व्यक्त केली होती. परंतु, सचिन निर्णयावर ठाम राहिला.