२००व्या कसोटी आधी सचिन खेळणार रणजी सामना

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर २०० व्या कसोटी सामन्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करणार आहे. त्यापूर्वी सचिन रणजी क्रिकेट सामना खेळणार आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Oct 16, 2013, 01:29 PM IST

www.24taas.com,वृत्तसंस्था, मुंबई
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर २०० व्या कसोटी सामन्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करणार आहे. त्यापूर्वी सचिन रणजी क्रिकेट सामना खेळणार आहे.
पुढील महिन्यात वेस्ट इंडीजविरुद्ध कसोटी मालिका सुरू होत आहे. त्याआधी सचिन मुंबईकडून रणजी सामना खेळणार आहे. रणजी करंडक स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात २७ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या हरियाणाविरुद्धच्या सामन्यात सचिन आणि झहीर खान मुंबई संघाकडून खेळणार आहेत.
वेस्ट इंडीजविरुद्ध कसोटी मालिकेची तयारी म्हणून सचिन हा सामना खेळणार आहे. सचिन मुंबईच्या वानखेडे मैदानावर विंडीजविरुद्ध होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यानंतर निवृत्त होणार आहे. त्यामुळे या सामन्यालाही महत्त्व प्राप्त झाले आहे. रोहतक जिल्ह्यातील लाहली येथे हरियाणाविरुद्ध २७ ते ३० ऑक्टोबर दरम्यान रणजी सामना होणार आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.