बिग बॉसमध्ये न्यूड योगा गुरूची एन्ट्री

रिअलिटी शो बिग बॉसच्या सीजन ७मध्ये घरात एका नव्या पाहुण्याची एन्ट्री झाली आहे. या व्यक्तीचे नाव विवेक मिश्रा असून तो एक योग गुरू आहे. परंतु त्याने ज्या योग साधनेचे प्रशिक्षण केले आहे तो साधा योग प्रकार नसून न्यूड योग असल्याने तो आकर्षणाचा विषय बनला आहे.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Oct 18, 2013, 07:59 PM IST

www.24taas.com , वृत्तसंस्था, मुंबई
रिअलिटी शो बिग बॉसच्या सीजन ७मध्ये घरात एका नव्या पाहुण्याची एन्ट्री झाली आहे. या व्यक्तीचे नाव विवेक मिश्रा असून तो एक योग गुरू आहे. परंतु त्याने ज्या योग साधनेचे प्रशिक्षण केले आहे तो साधा योग प्रकार नसून न्यूड योग असल्याने तो आकर्षणाचा विषय बनला आहे.
बिग बॉस ६ ची विजेती अभिनेत्री श्वेता तिवारीचा नवरा राजा चौधरीने रेपचा प्रयत्न केला होता असा आरोप या विवेक मिश्राने लावला होता. विवेक मिश्राची दुसरी ओळख म्हणजे तो एक योग गुरू आहे. न्यूड होऊन योग शिकवित असल्याने तो चर्चेत आला आहे.
त्याच्या योग शिकविण्याचा तंत्रावर अनेक वाद निर्माण झाले आहे. बिग बॉसच्या या सिजनमध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री मिळवणारा विवेक हा दुसरा व्यक्ती आहे. यापूर्वी बिग बॉसच्या घरात वाइल्ड कार्ड एन्ट्री बांगलादेशी मॉडेल आसिफ अजीम याला मिळाली होती.
बिग बॉसच्या शोमध्ये मसाला निर्माण करण्यासाठी विवेक मिश्राची एन्ट्री करण्यात आली आहे. या न्यूड योग गुरूमुळे या शोचा टीआरपी वाढेल हे नक्की....

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.