बिग बॉस`मध्ये मी जे करतो, ते मलाही पटत नाही- सलमान खान

सलमान खानच्या निवेदनामुळे `बिग बॉस ७` सुपरहिट होतंय खरं, पण तनीषा आणि कुशलच्या भांडणात सलमान खानने तनीषाला ती चुकीची असूनही तिला झुकतं माप दिल्याची तक्रार सगळीकडे होऊ लागली. या प्रकाराबद्दल त्याच्यावर एवढी टीका झाली की सलमान खानने स्वतःच याविषयी स्पष्टीकरण दिलं आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Nov 12, 2013, 05:52 PM IST

www.24taas.com, झी मीडिय़ा, मुंबई
सलमान खानच्या निवेदनामुळे `बिग बॉस ७` सुपरहिट होतंय खरं, पण तनीषा आणि कुशलच्या भांडणात सलमान खानने तनीषाला ती चुकीची असूनही तिला झुकतं माप दिल्याची तक्रार सगळीकडे होऊ लागली. या प्रकाराबद्दल त्याच्यावर एवढी टीका झाली की सलमान खानने स्वतःच याविषयी स्पष्टीकरण दिलं आहे.
ट्विटरवर यासंदर्भात वैतागून सलमान खानने स्पष्टीकरण दिलं आहे. “एखादी गोष्ट तुम्हाला आवडत नसेल, पटत नसेल तर ती करू नका. नाही तर बघा आणि मजा लुटा. हा सर्वात सोपा उपाय आहे. काही लोकांना बीबी७ (बिग बॉस ७) आवडत नसेल, तर ठीक आहे. प्रत्येकाची स्वतःची मतं असल्यामुळे बीबी७ वरून ट्विटरवर भांडण्यात काहीच अर्थच नाही. कित्येकवेळा मलाही मी जे बिग बॉस ७ मध्ये जे करतो, ते आवडत नाही. त्यामुळे इतरांवर आरोप करू नका.”
“या कार्यक्रमाची रचनाच अशी आहे, की आठवड्यागणिक या खेळात गुंतागुंत, भांडणं आणि स्पर्धकांची अस्वस्थता वाढत जात आहे. चाहते नाराज होत असले, तरी त्यांना समजायला हवं, की या खेळात आत्म सन्मान, अहंकार, राग या सर्वांचा कस लागतो. एका घरात डांबून राहाणं मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या अत्यंत घाबरवणारं असतं. नैराश्य आणणारं असतं. अशा कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणं खूप कठीण असतं. त्यांना कितीही समजावलं, तरी पुढच्या क्षणी ते आपल्या मनाप्रमाणेच वागू लागतात. त्यामुळे जे लोक कार्यक्रमाच्या सूत्रसंचालकाच्या बाजून किंवा विरोधात लढतात, त्यांनी शांत राहावं, कारण स्वतः सूत्रसंचालकालाही (सलमान खान) आपण करत असलेल्या चांगल्या वाईट गोष्टी आवडत नसतात.” अशा प्रकारचं वक्तव्य सलमान खानने केलं आहे.
“तोपर्यंत तुम्हाला जे हवं, ते तुम्ही करा. कार्यक्रमाचा आनंद लुटा. जे माझ्यावर खूश नाहीत, त्यांनी शनिवार आणि रविवारचे भाग पाहू नका. इतर अनेक महत्वाची कामं आहेत. ती सोडून हे एपिसोड पाहाण्यात वेळ वाया घालवू नका. निवडणुका येत आहेत. मतदान करा. तुम्हाला खरंच आवडत नसेल, तर पाहू नका. जर घरातील एका सदस्याला आवडत नसेल, तर त्यांचा आदर बाळगत तुम्हीही चॅनल बदला.” असंही सलमान खान म्हणाला आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.