www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
बिग बॉसच्या घरात कुशलची एन्ट्री झाल्याने त्याची घरातील गर्लफ्रेंड गोहर खानला खून आनंद झाला पण घरातील बहुतांशी सदस्यांसाठी ही डोकेदुखी झाली आहे. कुशलच्या घरातील एन्ट्रीने घरातील शांतता आणि सौदार्हाचे वातावरण जसे नाहीसे झाले आहे.
बिग बॉसच्या कालच्या भागात कुशलने केलेल्या भांडणाचा फटका अरमान, अँडी, तनिषा आणि संग्राम यांना बसला. त्यामुळे घरातील वातावरण कलुषित झाले.
कुशलने अँडीला मारहाण केल्यावर अरमानने शिक्कामोर्तब केल्यानंतर त्याची घरातून हकालपट्टी करण्यात आली होती. पण आता त्याची पुन्हा घरात एन्ट्री झाल्याने अँडी आणि अरमानशी पुन्हा एकदा भांडणं सुरू असल्याचं चित्र आहे.
कुशलला या कामात आता इजाज या खोडकर सदस्याची साथ लाभत आहे. इजाज हा कुशल घरातून बाहेर पडल्यावर गोहर खानच्या एकतर्फी प्रेमात पडला होता. आता कुशल आणि इजाजने युती केली असून ते अरमानचा आपल्या स्टाइलने मुकाबला करीत आहेत. अरमानला हे जाहीररित्या फ्लॉप अभिनेता आणि बुढ्ढा म्हणून हिणवत आहेत.
अरमान आणि तनिषाच्या संबंधाबद्दल जाहीरपणे चर्चा करताना त्याला पकडण्यात आले होते.
बिग बॉस 7 च्या काल झालेल्या भागात घरातील सदस्यांमध्ये जोरदार भांडण झाली. सोफियाने तर अरमानला ढकलून दिले. काही काळ तर अत्यंत वाईट परिस्थिती झाली, सदस्य एकमेकांना शिव्या देत होते. आरडाओरड करत होते.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.