करीना म्हणतेय सलमानपेक्षा सैफचे अॅब्स भारी!

रविवारी प्रदर्शित झालेल्या ‘बिग बॉस-७’ च्या भागात इमरान आणि करीना ‘गोरी तेरे प्यार में’, या सिनेमाचं प्रमोशन करण्यासाठी आले होते. यावेळी करीना सलमानला चक्क त्याचा शर्ट काढायला भाग पाडलं.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Nov 21, 2013, 11:48 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
रविवारी प्रदर्शित झालेल्या ‘बिग बॉस-७’ च्या भागात इमरान आणि करीना ‘गोरी तेरे प्यार में’, या सिनेमाचं प्रमोशन करण्यासाठी आले होते. यावेळी करीना सलमानला चक्क त्याचा शर्ट काढायला भाग पाडलं.
करीना आणि इमराननं काही काळासाठी बिग बॉसच्या घरात जाऊन स्पर्धकांची भेट घेतली आणि गप्पाही मारल्या. यावेळी
घरातील पुरूष सदस्य एका टास्कदरम्यान करीनाला इम्प्रेस करण्याच्या प्रयत्नात होते. करीना आणि इमरान दोघांनीही घरात खूप धम्माल केली.
‘गोरी तेरे प्यार मे’ सिनेमातील गाण्यावर करीना-इमरानसह घरातील इतर सदस्यही थिरकले. करीनानं घरातील सदस्यांशी गप्पा मारताना सांगितलं की, तिची आई अर्थातच बबिता या शोची सर्वात मोठी चाहती आहे आणि अॅन्डी हा तिचा सर्वात आवडता स्पर्धक आहे.’
घरातील सदस्यांसोबत काही काळ घालवल्यानंतर इमरान-करीनाने ‘बिग बॉसच्या’ सेटवर सलमानची भेट घेतली. सलमान नेहमीप्रमाणं मस्तीच्या मूडमध्ये होता. सलमान, करीनाला- करीना सैफ पतोडी असं संबोधत होता. करीना ही ‘बॉडीगार्ड’ सिनेमाची, त्याची सहकलारकार असल्याकारणानं सलामानसोबतची मस्ती भलतीच रंगात आली होती. तर दुसरीकडे, ‘तुम्ही कधी लग्न करणार असं,’ म्हणून करीनानं ही सलमानला चिडवलं. दोघंही एकमेकांना तोडीसतोड उत्तर देत होते.
मस्तीच्या या मूडमध्ये करीनानं सलमानला शर्ट काढून अॅब्स दाखवण्यास सांगितलं. यावर ‘शर्मिला बॉय’ सलमानचं लाजणं थांबता थांबत नव्हतं. सलमानचे अॅब्स बघण्यासाठी समोर बसलेल्या प्रेक्षकांमध्येही जल्लोश आणि उत्साहाचं वातावरण निर्माण झालं. मात्र उपस्थित प्रेक्षकांना सलमानचे अॅब्स पाहता आले नाही. सलमान आपले फोर पॅक अॅब्स दाखवायला करीनाकडे वळला. पण सलमानचे अॅब्स बघितल्यानंतर, ‘यापेक्षा सैफचे अॅब्स अधिक चांगले आहेत’, असं करीनानं म्हटलं.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.