किलर मिलरच्या शॉटनं आता एक मुलगा जखमी!

किंग्स इलेव्हन पंजाबसाठी आयपीएल-८ हे सीजन एवढं खास नव्हतं. १४ सामन्यांमध्ये पंजाब ६ अंकांसह शेवटच्या स्थानी राहिलंय. टीमसोबतच एका खेळाडूसाठीही हे सिझन खराब राहिलं आहे, तो खेळाडू आहे दक्षिण आफ्रिकेचा डेविड मिलर. 

Updated: May 17, 2015, 05:58 PM IST
किलर मिलरच्या शॉटनं आता एक मुलगा जखमी! title=

नवी दिल्ली: किंग्स इलेव्हन पंजाबसाठी आयपीएल-८ हे सीजन एवढं खास नव्हतं. १४ सामन्यांमध्ये पंजाब ६ अंकांसह शेवटच्या स्थानी राहिलंय. टीमसोबतच एका खेळाडूसाठीही हे सिझन खराब राहिलं आहे, तो खेळाडू आहे दक्षिण आफ्रिकेचा डेविड मिलर. 

कोलकाता नाईट रायडरविरूद्ध खेळलेल्या सामन्यात मिलरनं मारलेल्या एका षटकारानं कोलकाताच्या पोलीस कॉन्स्टेबलचा डोळा गेला होता. तर शनिवारी चेन्नई सुपकिंग्सविरुद्धच्या सामन्याआधी सरावादरम्यान मिलरनं मारलेल्या शॉटनं एक मुलगा चक्कर येऊन पडला. सिद्धार्थ असे त्या मुलाचे नाव आहे.

सरावादरम्यान मारलेला एक शॉट एका मुलाच्या छातीत लागला, शॉट एवढा जोरात होता मुलगा जागीच चक्कर येऊन पडला. पोलीस तात्काळ त्या मुलाला दवाखान्यात घेऊन गेले. त्याच्यावर उपचार करण्यात आले, आता त्याचा प्रकृती ठीक आहे. 

आयपीएलमधील ही दुसरी वेळ आहे, जेव्हा मिलरने मारलेल्या चेंडूवर कोणी जखमी झालं आहे. कोलकाता नाईट रायडरविरूद्धच्या सामन्यात मारलेला चेडू आलोक आइच यांना लागला होता. त्यात त्यांचा उजवा डोळा जखमी झाला होता, त्या डोळ्याने ते आता कधीही पाहू शकणार नाहीत. या घटनेने मिलर स्वत: अस्वस्थ होता. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.