तिरुअनंतपुरम : राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या दुसऱ्याच दिवशी महाराष्ट्राला जबरदस्त धक्का बसला. त्यांचा नेटबॉल खेळाडू मयुरेश पवार याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
साताऱ्या जवळील मायणी गावाचा १९ वर्षीय मयुरेश सोमवारी सकाळी ऍग्रीकल्चर कॉलेजच्या इनडोअर स्टेडियमवर चंडीगडविरुद्धचा सामना खेळला होता. सामन्यानंतर त्याला छातीत दुखू लागले. त्याच्यावर प्राथमिक उपचारदेखील करण्यात आले. या दरम्यान त्याला रक्ताची उलटीदेखील झाली. त्याला तातडीने शहरातील जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. पण, उपचारापूर्वीच त्याचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. उत्तरीय तपासणीनंतर त्याचे पार्थिव कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात येणार आहे.
केरळाचे क्रीडा मंत्री थिरुअंचूर राधाकृष्णन यांनी शोक व्यक्त केला. त्याचबरोबर मयुरेशचे पार्थिव महाराष्ट्रात नेण्यासाठी येणारा सर्व खर्च केरळ सरकारच्या वतीने करण्यात येईल असे सांगितले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.