३७ वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड तोडला रोहित शर्माने

 ऑस्ट्रेलियाविरूद्ध पाच सामन्यांच्या सीरीजच्या पहिल्या वन डे सामन्यात रोहित शर्माने कांगारूंची जबरदस्त धुलाई केली. 

Updated: Jan 12, 2016, 03:40 PM IST
३७ वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड तोडला रोहित शर्माने title=

पर्थ :  ऑस्ट्रेलियाविरूद्ध पाच सामन्यांच्या सीरीजच्या पहिल्या वन डे सामन्यात रोहित शर्माने कांगारूंची जबरदस्त धुलाई केली. 

रोहित शर्माने १२२ चेंडूत सेंचुरी लगावली. पर्थवर सेंच्युरी लगावणारा तो पहिला भारतीय ठरला आहे. यापूर्वी कोणत्याही भारतीयाने पर्थवर आंतरराष्ट्रीय सेंच्युरी लगावली नव्हती. 

३७ वर्षांचा रेकॉर्ड तोडला 

रोहित शर्माने पर्थमध्ये सेंच्युरी करताना १६३ चेंडूत १७१ धावा काढल्या. त्याने ३७ वर्षांपूर्वी पर्थवर विवियन रिचर्ड यांचा १५३ धावांचा केलेला रेकॉर्ड तोडला आहे.  रोहितने आपल्या खेळीत १३ चौकार आणि सात षटकार लगावले.