असं काय घडलं की, क्रिकेटर डिव्हीलिअर्स टॉवेल घालून बाहेर आला?

दक्षिण आफ्रिकेचा वनडे टीमचा कर्णधार आणि ग्रीनपार्कमध्ये जोरदार धमाका करणारा एबी डिव्हीलिअर्स हॉटेल लॅंडमार्कच्या बाहेर टॉवेल घालून बाहेर आला. काल सामना संपल्यानंतर त्याच्या डिहाईड्रेशनची चर्चा होती.

Updated: Oct 13, 2015, 02:13 PM IST
असं काय घडलं की, क्रिकेटर डिव्हीलिअर्स टॉवेल घालून बाहेर आला? title=

कानपूर : दक्षिण आफ्रिकेचा वनडे टीमचा कर्णधार आणि ग्रीनपार्कमध्ये जोरदार धमाका करणारा एबी डिव्हीलिअर्स हॉटेल लॅंडमार्कच्या बाहेर टॉवेल घालून बाहेर आला. काल सामना संपल्यानंतर त्याच्या डिहाईड्रेशनची चर्चा होती.

आज हॉटेलमधून बाहेर पडता तो टॉवेल आणि बनियान घालून बाहेर आला. त्यामुळे त्याच्या आजाराची चर्चा सुरु झाली. हॉटेलमध्ये डॉक्टरही उपस्थित होते. मात्र, त्याच्या आजाराची अधिकृत माहिती मिळाली नाही.

दुपारी कडक सुरक्षा व्यवस्थेत भारत आणि दक्षिण आफ्रिकेची टीम लखनऊला रवाना झाली. येथे विमान पकडून टीम इंदोरला पोहोलची. टीम हॉटेलच्या बाहेर पडल्यानंतर समजले की दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंचे सामान खोलीमध्येत राहीले. त्यामुळे काही गाड्या थांबविण्यात आल्या. तर काही खेळाडूंना घेऊन गाड्या विमानतळाकडे रवानाही झाल्या होत्या.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.