अझरुद्दीननंतर 199वर बाद होणारा लोकेश ठरला दुसरा भारतीय क्रिकेटपटू

चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यातील तिसऱ्या दिवशी भारतीय क्रिकेटपटूसोबत जे घडले ते तब्बल 30 वर्षात घडले नव्हते.

Updated: Dec 19, 2016, 10:33 AM IST
अझरुद्दीननंतर 199वर बाद होणारा लोकेश ठरला दुसरा भारतीय क्रिकेटपटू title=

चेन्नई : चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यातील तिसऱ्या दिवशी भारतीय क्रिकेटपटूसोबत जे घडले ते तब्बल 30 वर्षात घडले नव्हते.

जबरदस्त 199 धावांची खेळी करणाऱ्या सलामीवीर लोकेश राहुलचे द्विशतक अवघ्या एका धावेने हुकले. तब्बल 30 वर्षानंतर भारतीय क्रिकेटपटूचे द्विशतक केवळ एका धावेने हुकले.  

याआधी 1986मध्ये कानपूरमध्ये श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन 199वर बाद झाले होते. त्यानंतर लोकेश राहुल काल 199 धावांवर बाद झाला. 199वर बाद होणारा तो नववा क्रिकेटपटू ठरलाय.