लीड्स: इग्लंडचा कर्णधार अॅलिस्टर कूकनं नवा रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे. कूक इंग्लंडकडून सर्वात जास्त धावा बनवणारा खेळाडू बनला आहे. तसंच वर्ल्ड क्रिकेटमधील १४वा यशस्वी फलंदाज बनला आहे.
कूकनं इंग्लडसाठी खेळतांना ११४ टेस्ट मॅचेसमध्ये ४६च्या सरासरीनं ८९०१ धावा केल्या आहेत. ज्यात २७ शतकं आणि ४० अर्धशतकांचा समावेश आहे. कूकनं इंग्लंच्या ग्राहम हूच यांना मागे टाकलं आहे. त्यांच्या नावे ८९०० धावा होत्या. तसंच कूक हा पल्ला गाठणारा सर्वात युवा खेळाडू ठरला आहे.
कूकनं भारताविरुद्ध २००६ साली नागपूरमध्ये पहिला कसोटी सामना खेळला होता. २०१०साली त्याची इंग्लंडचा कर्णधार म्हणून निवड झाली. त्यानं टीमचं नेतृत्व करतांना ३३ सामन्यात ४७ च्या सरासरीनं २६८३ धावा केल्या आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.