सेमीफायनल आधी अमिताभ यांनी गेलला काय म्हटलं

भारत-वेस्ट इंडिज यांच्यामध्य़े सेमीफायनल रंगणार आहे. दोन्ही ही संघ मुंबईत दाखल झाले आहे. वेस्ट इंडिजचा स्फोटक बॅट्समन क्रिस गेल याने अमिताभ बच्चन यांना भेटण्याची इच्छा वर्तवली आणि त्यांच्या घरी पोहोचला.

Updated: Mar 29, 2016, 05:27 PM IST
सेमीफायनल आधी अमिताभ यांनी गेलला काय म्हटलं title=

मुंबई : भारत-वेस्ट इंडिज यांच्यामध्य़े सेमीफायनल रंगणार आहे. दोन्ही ही संघ मुंबईत दाखल झाले आहे. वेस्ट इंडिजचा स्फोटक बॅट्समन क्रिस गेल याने अमिताभ बच्चन यांना भेटण्याची इच्छा वर्तवली आणि त्यांच्या घरी पोहोचला.

सोमवारी रात्री झालेल्य़ा भेटीमध्ये दोघांमध्ये मॅचबाबत चर्चा झाली. क्रिस गेलने इंस्टाग्रामवर अमिताभ यांच्या सोबतचे फोटो शेअर केले आहे. गेलने म्हटलं आहे की, 'अमिताभ यांची इच्छा आहे की मी १०० रन करावे पण भारत जिंकावा. अमिताभ खरोखर लेजेंड आहेत. शानदार पाहुणचारसाठी धन्यवाद, माझ्या कडून तुम्हाला खूप आदर आणि प्रेम.'

अमिताभ बच्चन यांनी यानंतर ट्विट केलं आहे की, 'मला माहित नाही की गेल माझा फॅन आहे, पण तो खूप चांगला व्यक्ती आहे. मला आशा आहे की गेल माझ्या कॉम्पिलीमेंटला गुरुवारी होणाऱ्या मॅचदरम्यान लक्षात ठेवेल.'

गेलने अमिताभ यांना बॅट देखील भेट दिली. त्याने म्हटलं की अमिताभ यांची स्टाईल आणि सिनेमे मला आवडतात. अमिताभ यांनी ही त्याला धन्यवाद म्हटलं आहे.