सिंगापूर : बॉलीवूड जगतातील महानायक अमिताभ बच्चन लवकरच टेनिस कोर्टवर दिसणार आहेत. अमिताभ यांनी इंटरनॅशनल टेनिस पिमियर लीग ओयूई सिंगापूर स्लैमर्सचे सहमालक झाले आहेत. आमिताभ आणि युडी ग्रुप हे दोघें ओयूई सिंगापूर स्लैमर्सचे मालक असणार आहेत.
१८ ते २० डिसेंबरदरम्यान सिंगापूरमध्ये आयपीटीएलचा अंतिम लेग होणार आहे. यावेळी स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी अमिताभ सिंगापूरमध्ये उपस्थित असणार आहेत. माझ्या कामामुळे मला जास्त वेळ भेटत नाही त्यामुळे केवळ एक दिवस मी या स्पर्धेला उपस्थित राहू शकणार आहे. मला विश्वास आहे की सिंगापूर स्लॅमर्स अंतिम फेरीत असतील, असे अमिताभ यांनी यावेळी सांगितले.
आयपिटीएलचे हे दुसरे वर्ष आहे. आयपिटीएलमध्ये एकूण पाच टिम खेळणार आहे. यात सिंगापूर स्लॅमर्ससह, जपान वॉरियर्स, इंडियन एसेस, फिलीपाईन्स मॅव्हेरिक्स, युएई रॉयल संघाचा समावेश असणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.