कर्णधार म्हणून टी-२० क्रिकेटमध्ये धोनीचं द्विशतक

आयपीएल-८च्या फायनलमध्ये चेन्नई अजून पोहचली नसली तरी कॅप्टन कूल धोनीनं एक रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे. धोनी टी-20 सामन्यात कर्णधार म्हणून २०० सामने खेळणारा पहिला खेळाडू ठरला आहे.

Updated: May 20, 2015, 07:55 PM IST
कर्णधार म्हणून टी-२० क्रिकेटमध्ये धोनीचं द्विशतक title=

मुंबई: आयपीएल-८च्या फायनलमध्ये चेन्नई अजून पोहचली नसली तरी कॅप्टन कूल धोनीनं एक रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे. धोनी टी-20 सामन्यात कर्णधार म्हणून २०० सामने खेळणारा पहिला खेळाडू ठरला आहे.

टीम इंडिया आणि चेन्नई सुपरकिंग्स यामध्ये कर्णधार पद भूषवून धोनीने हा रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे. चॅम्पियन्स लीग आणि आतंरराष्ट्रीय टी-२० सामने मिळून धोनी २०० सामने खेळला आहे. हा कारनामा करणारा धोनी जगातील पहिला खेळाडू ठरला आहे.

धोनी २००७ पासून टीम इंडियाचा कर्णधार आहे. तर २००८मध्ये तो आयपीएलमधील चेन्नई सुपरकिंग्स टीमचा कर्णधार बनला होता.

धोनीच्या नेतृत्वातच भारताने २००७ साली टी-२० वर्ल्डकपवर आपलं नाव कोरलं होतं. याशिवाय धोनीच्या नेतृत्वातच चेन्नई सुपरकिंग्सने आयपीएलचं दोनदा आणि चॅम्पियन्स लीगचं दोनदा विजेतेपद आपल्या नावे केलं आहे.
    

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.