ऑस्ट्रेलिया-बांग्लादेशमध्ये आज करो या मरो

बैंगळुरच्या चिन्नास्वामी स्टेडियममध्ये दुसऱ्या ग्रुपमधल्या ऑस्ट्रेलिया आणि बांग्लादेश आज आमने-सामने येणार आहेत. 

Updated: Mar 21, 2016, 02:29 PM IST
ऑस्ट्रेलिया-बांग्लादेशमध्ये आज करो या मरो title=

बैंगळुर: बैंगळुरच्या चिन्नास्वामी स्टेडियममध्ये दुसऱ्या ग्रुपमधल्या ऑस्ट्रेलिया आणि बांग्लादेश आज आमने-सामने येणार आहेत. स्पर्धेतलं आपलं आव्हान कायम ठेवण्यासाठी या दोन्ही टीम मैदानात उतरतील, कारण या दोन्ही टीमना आपल्या पहिल्याच मॅचमध्ये पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. 

त्यामुळे आजची मॅच हरणाऱ्या टीमचं सेमी फायनलमध्ये जायचं स्वप्न आणखी कठीण होईल. पण बांग्लादेश ही मॅच जिंकलं तर भारताला मात्र फायदा व्हायची शक्यता आहे. 

कारण भारताच्या आता दोन्ही मॅच बांग्लादेश आणि ऑस्ट्रेलियाबरोबरच राहिल्या आहेत. बांग्लादेशबरोबरची मॅच भारतासाठी तशी सोपी मानली जात आहे. तर ऑस्ट्रेलियाला मात्र बांग्लादेशनंतर पाकिस्तान आणि भारतासारख्या तगड्या टीमसोबत खेळायचं आहे. 

बांग्लादेशला मात्र या मॅचआधीच दोन धक्के बसले आहेत. बांग्लादेशचा फास्ट बॉलर तस्किन अहमद आणि स्पिनर अराफत सनी यांच्या बॉलिंग ऍक्शनवर तक्रार घेत आयसीसीनं दोघांवरही बंदी घातली आहे.