...आणि अनुष्का बनली विराटची 'पत्नी'!

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा सध्या अभिनयापेक्षा क्रिकेटर विराट कोहलीसोबत असलेल्या नातेसंबंधांमुळे जास्त चर्चेत आहे. अनेक इव्हेंटसमध्ये आणि ठिकाणी हे जोडपं हातात हात घालून फिरताना दिसतं... याचमुळे की काय ऑस्ट्रेलियाच्या एक टीव्ही प्रेझेंटरही थोडी 'कन्फ्युझ' झाली.

Updated: Dec 30, 2014, 05:56 PM IST
...आणि अनुष्का बनली विराटची 'पत्नी'! title=

नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा सध्या अभिनयापेक्षा क्रिकेटर विराट कोहलीसोबत असलेल्या नातेसंबंधांमुळे जास्त चर्चेत आहे. अनेक इव्हेंटसमध्ये आणि ठिकाणी हे जोडपं हातात हात घालून फिरताना दिसतं... याचमुळे की काय ऑस्ट्रेलियाच्या एक टीव्ही प्रेझेंटरही थोडी 'कन्फ्युझ' झाली.

मॅच दरम्यान अनुष्का शर्माला फ्लाईंग किस देणारा विराट कोहली सगळ्यांनीच पाहिला... मीडियासमोर आपल्या प्रेमाबद्दल भाष्यंही न करणाऱ्या या लव्ह बर्डसनं सार्वजनिक ठिकाणी आपल्या प्रेमाचा प्रदर्शनामुळे ऑस्ट्रेलियन टीव्ही प्रेझेंटेटरलाही ही दोघं पती-पत्नी असल्याचा गैरसमज झाला... आणि लाईव्ह मॅचच्या कमेंट्री दरम्यान तिनं अनुष्काचा उल्लेख विराट कोहलीची 'पत्नी' असा केला. 

मेलबर्नमध्ये आयोजित केलेल्या ऑस्ट्रेलिया-इंडिया क्रिकेट मॅच दरम्यान शेवटच्या दिवशी कमेंट्री दरम्यान ऑस्ट्रेलियन प्रेझेंटेटर मिशेल स्लॅटर हिनं अनुष्काचा उल्लेख विराटची पत्नी असा केला. पण, थोड्याच वेळात तिला तिची चूक उमजली आणि नंतर तिनं अनुष्काचा उल्लेख 'विराटची होणारी पत्नी' असा केला.

यावेळी, विराटनं सेन्चुरी ठोकली होती... आणि आपलं हेल्मेट काढून विराटनं अनुष्काला फ्लाईंग किस दिला होता. यावेळी, अनुष्का आपल्या जागेवर उभी राहिली आणि टाळ्या वाजवत तिनं विराटचं अभिनंदन केलं. यावेळी, मिशेलनं अनुष्काचा उल्लेख विराटची पत्नी असा केला होता.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

 

 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x