मुंबई : बीसीसीआय अर्थातच भारतीय क्रिकेट बोर्डानं वेस्ट इंडिजवर निलंबनाची कारवाई केली आहे. भारतानं यापुढे विंडीज बरोबर न खेळण्याचा निर्णय घेतलाय.
मानधनाच्या मुद्दयावरुन विंडीज क्रिकेटपटूंनी भारताचा दौरा अर्धवट सोडला होता. यावर बीसीसीआयनं बैठक घेत विंडीजविरुद्ध सर्व द्विपक्षिय सीरिज रद्द केल्यात. त्याचप्रमाणे आता बीसीसीआयनं विंडीज बोर्डावर कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णयही घेतलाय.
दरम्यान, 2016 मध्ये भारतीय टीम विंडीजच्या दौ-यावर तीन टेस्ट, पाच वन-डे आणि एक टी-20 मॅच खेळणार होती. तर विंडीजनं दौरा अर्धवट सोडल्यानंतर आता श्रीलंकन टीम भारतात येणार आहे.
लंकन टीम भारताविरुद्ध 5 वन-डे मॅचेसची सीरिज खेळेल. यातील तीन वन-डेसाठी विराट कोहलीकडे नेतृत्व सोपवण्यात आलंय. तर महेंद्रसिंग धोनीला विश्रांती देण्यात आली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.