मुंबई : वर्ल्डकप २०१५चा अंतिम सामना रविवारी न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये मेलबर्न येथे होत आहे. दोन्ही संघ तगडे आहेत. त्यांच्यातील चुरस रंगणार हे सत्य आहे. मात्र, पुन्हा एकदा तो प्रसंग आठवला की अंगावर काटा येतो. ऑस्ट्रेलियाच्या चिटींगची आठवण पुन्हा जागी झाली.
ही गोष्ट आहे १ फेब्रुवारी १९८१ची. मेलबर्न मैदानावर झालेल्या न्यूझीलंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्याची. क्रिकेटच्या इतिहासातील तो एक वादातीत सामना होता. बेन्सन हेजेस सिरिजचा तिसरा आणि अंतिम सामना सुरु होता. ऑस्ट्रेलियाने पहिली बॅंटींग करत २३६ रन्सचे टार्गेट न्यूझीलंडसमोर ठेवले होते. लक्ष्याचा सामना करताना न्यूझीलंडचे ओपनर बॅट्समन ब्रूस एडगर यांनी शतक ठोकत न्यूझीलंडला विजयाजवळ आणून ठेवलं होतं.
मॅचच्या शेवटच्या बॉलवर ७ रन्सची आवश्यकता असताना ऑस्ट्रेलियाचा कर्णधार ग्रेग चॅपल यांने असा एक निर्णय वादातीत घेतला की त्यामुळे ही मॅच विवादीत झाली. शेवटची ओव्हर ट्रेवर चॅपल टाकत होते. त्यावेळी ग्रेग चॅपल यांनी ट्रेवर चॅपल याला तो शेवटचा बॉल 'अंडरआर्म' टाकण्याचा सल्ला दिला. त्यावेळच्या नियमानुसार हे चुकीचे नव्हते. त्यामुळे तो बॉल खेळता न आल्याने न्यूझीलंडने तो सामना गमावला होता.
किमान सामना अनिर्णित करण्याची संधी न्यूझीलंडने गमावली होती. चॅपल बंधूची ही विवादीत कृती क्रिकेटच्या इतिहासातील लज्जास्पद घटना म्हणून प्रसिद्ध आहे. न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी ही घटना खेळ भावनेच्या विरूद्ध असल्याचे मत व्यक्त केले होते. नंतर या घटनेबद्दल चॅपल बंधूनी सार्वजनिकरित्या माफी मागितली होती.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.