मुंबई : वर्ल्ड कप २०१५ दरम्यान भारताला प्रोत्साहन देण्यासाठी बीसीसीआयकडून 'मौका मौका' ही जाहिरात प्रसिद्ध करण्याता आली होती. त्या जाहिरातीचा जेवढा आनंद भारतीय प्रेक्षकांनी लुटला, तेवढाच त्रास आता बीसीसीआयला सहन करावा लागत आहे. चक्क बीसीसीआयने आपला फोन बंद करण्याचा निर्णय घेतला.
भारत-पाकिस्तान या मॅचसाठी ही जाहिरात बनवण्यात आली होती. त्यात एक पाकिस्तानी प्रेक्षक दाखवण्यात आला होता. जो कित्येक वर्षांपासून पाकिस्तान वर्ल्ड कपमध्ये भारताविरूद्ध जिंकावी याची प्रतिक्षा करत असतो. मात्र पुढे भारताविरूद्ध खेळणाऱ्या प्रत्येक टीमविषयी, अशी जाहिरात तयार करण्यात आली होती, त्यात बांग्लादेशचाही समावेश होता.
या वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तान आणि बांग्लादेशला भारताने मोठ्या फरकाने पराभूत केले होते. मात्र भारताचा ऑस्ट्रेलियाविरूद्ध सेमीफायनलमध्ये पराभव झाल्यानंतर पाकिस्तान आणि बांग्लादेशच्या चाहत्यांनी बीसीसीआयच्या कार्यालयात फोन करून भारताची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला . 'मौका-मौका लेकिन क्या हुआ मौके का?' असे सवाल ते करीत राहिले.
पाकिस्तान आणि बांग्लादेशमधून असे सुमारे २०० कॉल बीसीसीआच्या कार्यालयात आले होते. चौकशी दरम्यान समजले की, हे सर्व कॉल पाकिस्तान आणि बांग्लादेशमधून आले होते. सततच्या होणाऱ्या त्रासाला वैतागून नंतर बीसीसीआयच्या कार्यालयाचा फोन बंद करण्याचा निर्णय बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतल्याचे वृत्त आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.