रिओ द जनेरियो : पाच वेळेचा विश्व विजेता ब्राझीलने विश्व चषकात चिलीला पेनल्टी शूटआऊटमध्ये हरवून टॉप १६ मध्ये जागा मिळविली. या सामन्याने ट्विटरचे सर्व रेकॉर्ड ब्रेक केले आहे.
एका रिपोर्टनुसार हा सामना ट्विटरवर सर्वाधिक चर्चित सामना होता. ब्राझीलने सामना जिंकून क्वार्टर फायनलमध्ये जागा निश्चित केली. या मॅचला सुमारे १ कोटी ६४ लाख जणांनी ट्वीट केली. प्रत्येक जण केवळ या सामन्याविषयी चर्चा करत होते.
या सामन्याच्या थेट प्रक्षेपणाच्यावेळी प्रति मिनिट सर्वाधिक ट्वीट करण्यात आले. जेव्हा गोंजलो जाराने शेवटची पेनल्टी किक चुकवली तेव्हा प्रत्येक मिनीट ट्वीटची संख्या ३ लाख ८९ हजार इतकी होती. यापूर्वी एनएफएल सुपर बॉलवेळी मिनिटाला ३ लाख ८२ हजार ट्वीट करण्यात आले होते.
विश्व चषकात ट्वीट रेकॉर्ड यापूर्वी ब्राझील आणि क्रोएशियाच्या सामन्यावेळी १२ जूनला झाला होता.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.