फिफा वर्ल्ड कप - फ्रान्स, जर्मनीचा विजय

 रंगतदार लढतीत फ्रान्सनं नायजेरियावर 2-0 नं मात करत क्वार्टर फायनल गाठली. पोल पोग्बानं मोक्याच्या क्षण गोल करत फ्रेन्च टीमचं वर्ल्ड कपमधील आव्हान जिवंत ठेवलं. तर दुसरीकडे जर्मनीनं विजय मिळवत आपलं स्थान भक्कम केले.

AP | Updated: Jul 1, 2014, 08:33 AM IST
फिफा वर्ल्ड कप - फ्रान्स, जर्मनीचा विजय title=

ब्राझील : रंगतदार लढतीत फ्रान्सनं नायजेरियावर 2-0 नं मात करत क्वार्टर फायनल गाठली. पोल पोग्बानं मोक्याच्या क्षण गोल करत फ्रेन्च टीमचं वर्ल्ड कपमधील आव्हान जिवंत ठेवलं. तर दुसरीकडे जर्मनीनं विजय मिळवत आपलं स्थान भक्कम केले.

78 मिनिटं दोन्ही टीम्सला गोल करण्यात अपयश आलं होतं. नायजेरियानं फ्रान्सला रोखून ठेवत या मॅचमध्ये सा-यांनाच आपली दखल घ्यायला लावली.

दरम्यान, जर्मनीनं रोमहर्षक लढतीत अल्जेरियावर 2-1 नं विजय मिळवला. या विजयासह जर्मनीनं वर्ल्ड कपच्या क्वार्टर फायनलमध्ये धडक मारली. जर्मनीकडून आंद्रे शर्ले आणि मेस्यूट ओझिलनं प्रत्येकी एकेक गोल झळकावला. तर अल्जेरिया टीमकडून जाबूनं गोल केला. मात्र त्याला आपल्या टीमला विजय मिळवून देता आला नाही.

अंडरडॉग्ज म्हणून या टीमकडे पाहिलं जात होतं. मात्र, या आफ्रिकन टीमनं जर्मनीला विजयासाठी चांगलाच घाम घाळावा लागला. आता जर्मनीचा क्वार्टर फायनलचा मुकाबला फ्रान्सशी होईल.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.