ब्रेट लीने केलं विराट कोहलीचं 'विराट' कौतुक

कोहलीचं ऑस्ट्रेलियाचा दिग्गज जलद गोलंदाज ब्रेट लीकडून कौतुक.

Updated: Jan 20, 2016, 07:20 PM IST
ब्रेट लीने केलं विराट कोहलीचं 'विराट' कौतुक title=

कॅनबेरा : ऑस्ट्रेलियाविरोधात सलग दुसरं शतक ठोकणाऱ्या विराट कोहलीचं ऑस्ट्रेलियाचा दिग्गज जलद गोलंदाज ब्रेट लीने खूपच कौतुक केलंय. विराटचं कौतुक करतांना त्याने विराटची तुलना सचिन तेंडुलकर सोबत केली आहे.

विराट कोहलीने चौथ्या वनडेत ९२ बॉल मध्ये ११ फोर आणि १ सिक्सच्या मदतीने १०६ रन बनवत सलग दुसरी सेंचुरी ठोकली. त्यानंतर ब्रेट लीने त्याची खूपच प्रशंसा केली.

ब्रेट लीने म्हटलं की, विराट कोहलीला सलाम. तो महान आहे. विराट चांगल्या फॉर्ममध्ये आहे. तुम्ही या दिग्गज खेळाडूला कोठे बॉल टाकणार. विराटमध्ये सचिनची चमक दिसते. 

लीने पुढे म्हटलं की, जेव्हा तो लयमध्ये असतो तेव्हा त्याला आऊट करणे खूपच कठीन असतं. त्याच्याकडे आक्रमकता आणि नियंत्रण दोन्ही आहे.

कोहलीने वनडे क्रिकेटमध्ये आतापर्यंत २५ शतक करण्याचा रेकॉर्ड केला आहे. सर्वाधिक सेंचुरी ठोकणाऱ्यांच्या यादीत तो चौथ्या क्रमांकावर आहे. 

ब्रेट लीने उमेश यादव आणि सरन या दोघांचीही प्रशंसा केली.