SCORECARD - भारत वि. ऑस्ट्रेलिया, चौथी वन डे

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथी वन-डे कॅनबेराच्या मनूका ओव्हलवर रंगलेल्या मॅचमध्ये भारताचा २५ रन्सनं पराभव झालाय.

Updated: Jan 20, 2016, 05:07 PM IST

कॅनबेरा : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथी वन-डे कॅनबेराच्या मनूका ओव्हलवर रंगलेल्या मॅचमध्ये भारताचा २५ रन्सनं पराभव झालाय. याचबरोबर ऑस्ट्रेलियानं सीरिजमध्ये ४-० नं बाजी मारलीय. 

चौथ्या वन-डेमध्ये ऑस्ट्रेलियानं टीम इंडियासमोर विजयासाठी ३४९ रन्सचं टार्गेट ठेवल होतं.... पण, या टार्गेटपर्यंत पोहचताना टीम इंडियाची दमछाक झाली. 

नाही म्हणायला दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या शिखर धवन आणि तिसऱ्या क्रमांकावर बॅटींग करायला आलेल्या विराट कोहलीनं शतक झळकावलं... पण, त्यांची ही कामगिरी टीमच्या मात्र कामी आली नाही. या वन-डेमध्येही ऑस्ट्रेलियानं बॅट्समननं भारतीय बॉलर्सची चांगलीच धुलाई केली. ४९.२ ओव्हर्सला ३२३ रन्स काढून टीम इंडिया ऑल आऊट झाली... आणि ऑस्ट्रेलियानं २५ रन्सनं भारतावर विजय मिळवला.

कांगारुंकडून एरॉन फिंचनं सेंच्युरी झळकावली. तर डेविड वॉर्नरनं ९३ रन्सची खेळी केली. स्टिवन स्मिथनही हाफ सेंच्युरी ठोकली. तर भारताकडून उमेश यादव आणि ईशांत शर्माला प्रत्येकी तीन-तीन मिळाल्या.  
 
आजच्या पराभवामुळे टीम इंडियाची उरली सुरलेली प्रतिष्ठाही धुळीला मिळालीय.