मीरपूर: एका वर्षापूर्वी जेव्हा भारतीय संघ 50 ओव्हरचा वर्ल्ड कप खेळत होता, तेव्हा तरुणांनी भरलेल्या या संघामध्ये युवराज सिंग आणि आशिष नेहरा कमबॅक करतील असं कोणालाही वाटलं नसेल.
पण 36 वर्षांचा आशिष नेहरा आणि 34 वर्षांचा युवराज सिंग टी-20 वर्ल्ड कपसाठी कॅप्टन धोनीच्या रणनितीचा महत्त्वाचा हिस्ला बनले आहेत. टी-20 वर्ल्ड कपपर्यंत फीट राहण्यासाठी नेहरानं आपलं रोजचं रुटिन फॉलो करावं असा सल्ला धोनीनं दिला आहे.
तर युवराजबाबत आपण संयम बाळगायला हवा, असं धोनी म्हणाला आहे. तुम्ही अचानक मैदानात जाऊन तुम्हाला हवं तसं प्रत्येक वेळी खेळू शकत नाही. बॉल आणि बॉलरच्या गुणवत्तेनुसार बॅटिंग करावी लागते, असं धोनी म्हणात धोनी युवराजच्या बचावासाठी आला आहे.
बांग्लादेशविरुद्धच्या मॅचमध्ये युवराजनं 15 रन बनवले, तरी त्याचा आत्मविश्वास वाढला आहे. त्यानं मिड ऑफला एक चांगला शॉट मारला असं धोनी म्हणाला आहे.