राजकोट : वेस्ट इंडिजचा स्फोटक बॅट्समन क्रिस गेलनं टी-20मध्ये विश्वविक्रम केला आहे. टी-20मध्ये १० हजार रन्स करणारा गेल हा पहिला क्रिकेटपटू बनला आहे. आयपीएलमध्ये गुजरात लायन्सविरुद्धच्या मॅचमध्ये गेलं हे रेकॉर्ड बनवलं आहे.
गेलपाठोपाठ न्यूझीलंडच्या ब्रॅण्डन मॅक्कलमनं ७५२४ रन्स बनवल्या आहेत. टी-20मध्ये सर्वाधिक रन्स बनवणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीमध्ये आठ नंबरवर विराट कोहली तर नऊ नंबरवर सुरेश रैना आहे. विराटच्या टी-20मध्ये ६,६४१ रन्स आहेत तर रैनानं ६,५६६ रन्स बनवल्या आहेत.