संजू सॅमसन नव्हे हा तर सुपरमॅन

दिल्ली डेअरडेविल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सोमवारी खेळवण्यात आलेल्या सामन्यात कोलकाताने बाजी मारली. सामन्यात एका क्षणाला कोलकाताची अवस्था वाईट होती. मात्र युसुफ पठाण आणि मनीष पांडे यांच्या जबरदस्त खेळीमुळे सामन्याचे रुपच बदलले.

Updated: Apr 18, 2017, 04:35 PM IST
संजू सॅमसन नव्हे हा तर सुपरमॅन title=

नवी दिल्ली : दिल्ली डेअरडेविल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सोमवारी खेळवण्यात आलेल्या सामन्यात कोलकाताने बाजी मारली. सामन्यात एका क्षणाला कोलकाताची अवस्था वाईट होती. मात्र युसुफ पठाण आणि मनीष पांडे यांच्या जबरदस्त खेळीमुळे सामन्याचे रुपच बदलले.

या सामन्यात युसुफ आणि मनीषची खेळी कायमच चाहत्यांच्या लक्षात राहील. मात्र त्याबरोबरच संजू सॅमसनची जबरदस्त फिल्डींगही चाहते मिस करतील. 

या सामन्यात सॅमसनने इतकी जबरदस्त फिल्डींग केली की ते पाहून सारेच हैराण झाले. १९व्या शतकातील दुसऱ्या चेंडूत संजू सॅमसनने जबरदस्त फिल्डींग केली. मनीष पांडेने लगावलेला शॉट सॅमसनने जबरदस्त पद्धतीने अडवला.