क्रिस 'गेल'ला जसप्रीत बुम्राने केलं 'फेल'

वेस्ट इंडिज आणि भारत यांच्यात सेमीफायनल रंगत आहे. टी-२० विश्वचषक स्पर्धेतील दुसरा सेमीफायनलमध्ये सॅमीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टीम इंडियाच्या ओपनिंग जोडीने चांगली सुरुवात करुन दिली. विराट कोहलीने पुन्हा एकदा अप्रतिम खेळी करत केवळ ४७ चेंडूंचा सामना करत ८९ धावा केल्या. कर्णधार धोनीने नाबाद १५ धावा केल्या. कोहली आणि धोनीने २७ चेंडूत नाबाद ६४ धावांची पार्टनरशिप केली.

Updated: Mar 31, 2016, 09:21 PM IST
क्रिस 'गेल'ला जसप्रीत बुम्राने केलं 'फेल' title=

मुंबई : वेस्ट इंडिज आणि भारत यांच्यात सेमीफायनल रंगत आहे. टी-२० विश्वचषक स्पर्धेतील दुसरा सेमीफायनलमध्ये सॅमीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टीम इंडियाच्या ओपनिंग जोडीने चांगली सुरुवात करुन दिली. विराट कोहलीने पुन्हा एकदा अप्रतिम खेळी करत केवळ ४७ चेंडूंचा सामना करत ८९ धावा केल्या. कर्णधार धोनीने नाबाद १५ धावा केल्या. कोहली आणि धोनीने २७ चेंडूत नाबाद ६४ धावांची पार्टनरशिप केली.

रोहित शर्माने ४० तर रहाणेने ३५ चेंडूत ४० धावा केल्या. भारताने २ विकेट गमवत वेस्टइंडिजसमोर १९२ रन्स केले. वेस्टइंडिजचा धडाकेबाज गेल मात्र भारताविरोधात पुन्हा अपयशी ठरला आहे. बुम्राने दुसऱ्या ओव्हरमध्ये गेलला ५ रनवर चालतं केलं. तर लगेच तिसऱ्या ओव्हरमध्ये वेस्टइंडिजला नेहराने दुसरा धक्का दिला. ३.३ ओव्हरमध्ये वेस्टइंडिजने २ विकेट गमावत २७ रन्स केले आहेत.