क्रिस गेल बनला या क्रिकेटरचा 'अंकल'

नुकताच आयपीएल सीझन ९ संपुष्टात आलंय. या सीझनमध्ये क्रिस गेलची टीम रॉयल बंगळुरू चॅलेंजर्सला हैदराबाद सनरायजर्सकडून पराभव स्वीकारावा लागला. 

Updated: Jun 4, 2016, 06:10 PM IST
क्रिस गेल बनला या क्रिकेटरचा 'अंकल' title=

नवी दिल्ली : नुकताच आयपीएल सीझन ९ संपुष्टात आलंय. या सीझनमध्ये क्रिस गेलची टीम रॉयल बंगळुरू चॅलेंजर्सला हैदराबाद सनरायजर्सकडून पराभव स्वीकारावा लागला. 

यानंतर गेलनं आपल्या टीमच्या साथीदारांचा मूड चांगला राहावा यासाठी अनेक प्रयत्न केले. यावेळी, त्यानं आपल्या एका सहकारी खेळाडूला एक खास पुस्तक भेट म्हणून दिलं. हे पुस्तक म्हणजे क्रिस गेलची बायोग्राफी आहे. 

युजवेंद्र चहल... 

क्रिस गेलनं ज्या युवकाला हे पुस्तक भेट म्हणून दिलं तो आहे युजवेंद्र चहल... युजवेंद्रनं आयपीएलच्या या सीझनमध्ये चांगलंच प्रदर्शन केलंय. आरसीबीची खेळी जबरदस्त राहावी, यासाठी युजवेंद्रचा मोलाचा हातभार टीमला लागलेला दिसला. 

क्रिस गेलकडून हे गिफ्ट मिळाल्यानंतर युजवेंद्र भलताच खुश झाला... या गिफ्टसाठी धन्यवाद म्हणताना युजवेंद्रनं 'धन्यवाद गेल अंकल' असं म्हटलंय. 

युजवेंद्रची कामगिरी

युजवेंद्र या टूर्नामेंटमध्ये सगळ्यात जास्त विकेट घेणारा दुसऱ्या क्रमांकाचा खेळाडू बनलाय. भुवनेश्वर कुमार यात पहिल्या क्रमांकावर आहे. युजवेंद्रनं १३ मॅचमध्ये २१ विकेट घेतल्यात.