नवी दिल्ली: क्रिस गेलच्या ज्या खेळीची चर्चा सध्या संपूर्ण जगात सुरू आहे. मात्र गेलच्या या खेळीचा भारताशी असलेला एक संबंध समोर आलाय. गेलनं काल १६ षटकार आणि १० चौकार मारून क्रिकेट वर्ल्डकपमधील पहिली डबल सेंच्युरी केलीय.
टाइम्स ऑफ इंडियातील बातमीनुसार गेलनं या खेळीसाठी ज्या बॅटचा वापर केला ती भारतातील आहे. जालंधरच्या पंजाब स्पोर्ट्स गुड्स स्पार्टनमध्ये तयारी केली गेलेली ही बॅट आहे.
स्पार्टनचे कंपनी पार्टनर अमित शर्मा यांनी सांगितलं की, वर्ल्डकपसाठी गेलला १५ बॅट पाठविण्यात आल्या होत्या. बॅट तयार करतांना लांबी आणि वजन लक्षात घेऊन ही बॅट बनवली गेली होती. गेल जड बॅट वापरतो. त्यानं १२५०-१३०० ग्राम वजनाच्या बॅटची मागणी केली होती.
अमितच्या मते त्यांच्या बॅटचा वापर महेंद्र सिंह धोनीसोबतच ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन मायकल क्लार्क आणि इंग्लंडचा कॅप्टन इयान मोर्गन हे सुद्धा करतात.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.