लंडन : इंग्लंड दौऱ्य़ावर गेलेल्या विराट कोहलीने आतापर्यंत दोन कसोटी सामन्यात अपयशी ठल्याने कोचने त्याला सल्ला दिला आहे.
25 आणि 0 असे रन्सवर आऊट झाल्याने विराटचा सल्ला दिला गेलाय. इंग्लंड दौऱ्य़ाआधी कोहली चांगला खेळत होता. पण सध्या त्याला मैदानावर कसरत करावी लागते आहे. कोहलीला लहानपणीच क्रिकेटचे धडे शिकवणारे त्याचे कोच राजकुमार शर्मांनी त्याला सल्ला दिला आहे की ज्यामुळे तो पुन्हा आपल्या फॅारमात परत येऊ शकेल.
शर्मांनी स्विंगशी सामना करण्यासाठी कोहलीला सल्ला दिलाय की, सुरवातीला स्वेकअर ऑफ द विकेट शॉट नको खेळत जाऊस. शर्मांनी म्हंटल आहे, विराटच्या नावावर सहा टेस्ट सेंच्युरी आहेत. तो खूप वेळापर्यंत शांत नाही राहू शकतं नाही. माझं सतत त्याच्याशी बोलणं होतं रहातं. त्याला 'व्ही' ध्यानात ठेवून खेळलं पाहीजे. त्यामुळे त्याला स्विंग आणि सीम मूव्हमेंटशी सामना करण्यात मदत होईल. शर्मांनी त्याला फ्लिक करतानाही सावधानी बाळगताना त्यांने सरळ बॅटने खेळलं पाहीजे.
मी चिंतित नाही आहे. कारण कोहली खराब शॉट खेळून आऊट झाला नाही पाहिजे, पूर्व रणजी खेळाडू शर्मानी म्हंटलं. बॅाल स्विंग झाला आणि दहा मधले नऊ बॅटसमन त्या बॅालवर अशाच प्रकारे आऊट झाले असते. तो लवकरच मोठी खेळी करून दाखवेलं, असं शर्मा यांनी म्हटलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.