क्रिकेट वर्ल्डकपची ती फायनल जेव्हा दोनदा टॉस झाला

 क्रिकेटच्या मैदानात नेहमीच उत्साह असतो. चौकार आणि षटकारांचा पाऊस पडतो. नियमांनुसार नेहमी प्रत्येक मॅचपूर्वी टॉस केला जातो आणि नंतर टॉस जिंकणारी टीम पहिले बॅटिंग किंवा बॉलिंग करण्याचा निर्णय घेते. 

Updated: Mar 17, 2015, 02:17 PM IST
क्रिकेट वर्ल्डकपची ती फायनल जेव्हा दोनदा टॉस झाला title=

मुंबई:  क्रिकेटच्या मैदानात नेहमीच उत्साह असतो. चौकार आणि षटकारांचा पाऊस पडतो. नियमांनुसार नेहमी प्रत्येक मॅचपूर्वी टॉस केला जातो आणि नंतर टॉस जिंकणारी टीम पहिले बॅटिंग किंवा बॉलिंग करण्याचा निर्णय घेते. 

मात्र २०११मध्ये क्रिकेट वर्ल्डकपच्या फायनल दरम्यान दोन वेळा टॉस करण्याची वेळ आली. हे घडलं होतं मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर जिथं २०११मध्ये वर्ल्डकप फायनल श्रीलंका आणि भारतादरम्यान खेळली जात होती. क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदा घडलं होतं. जेव्हा दोन वेळा टॉस करण्यात आला. 

भारत आणि श्रीलंकेदरम्यान वानखेडे स्टेडिअमवर पहिले टीम इंडियाचा कॅप्टन महेंद्र सिंह धोनीनं शिक्का टॉससाठी फेकला, तेव्हा श्रीलंकेच्या कॅप्टन कुमार संगकारने हेड म्हटलं की टेल याबाबत कन्फ्युजन निर्माण झालं. कुमार संगकारा आणि धोनीमध्ये चर्चेनंतर मॅच रेफरी ज्यौफ क्रोनं दुसऱ्यांदा टॉस करण्याचा निर्णय घेतला. श्रीलंकेच्या कॅप्टननं दुसऱ्या प्रयत्नातही टॉस जिंकला आणि पहिले बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला.

श्रीलंकेकडून महेला जयवर्धनेनं इनिंग सावरली होती आणि ८८ बॉल्सवर १०३ रन्स करून श्रीलंकेनं २७४/६  इतका स्कोअर केला होता. भारताची सुरूवात चांगली झाली नव्हती. मात्र कॅप्टन कूल धोनीमुळे भारतानं या मॅचमध्ये दमदार विजय मिळवून दुसऱ्यांदा वर्ल्डकप जिंकून दिला.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.