मुंबई : बांग्लादेश दौऱ्यासाठी आज मुंबईत टीम सिलेक्शन केलं जाणार आहे. धोनी आणि विराट कोहलीने विश्रांतीची मागणी केल्यानं या दौऱ्यावर ते आपल्याला खेळताना दिसणार नाहीत. या दौऱ्यावर टीम इंडिया एक टेस्ट आणि तीन वन-डे खेळणार आहे.
गेली अनेक महिने क्रिकेट खेळत असलेली टीम इंडिया आता जूनमध्ये बांग्लादेश दौऱ्यावर जाणार आहे. बांग्लादेश दौरा फारसा महत्त्वाचा नसल्यानं काही महत्त्वाचे प्लेअर्स या सीरिजमध्ये खेळताना दिसण्याची शक्यता नाही.
मुंबईत सिलेक्शन कमिटीचे अध्यक्ष संदीप पाटील यांच्या अध्यक्षतेखाली एक टेस्ट आणि तीन वन-डेसाठी टीम सिलेक्शन केलं जाणार आहे. महेंद्रसिंग धोनीने यापूर्वीच बांग्लादेश दौऱ्यासाठी विश्रांतीची मागणी केलीय तर आता विराट कोहलीनेही विश्रांतीची मागणी केल्यानं रोहित शर्माकडे कॅप्टन्सीची जबाबदारी सोपवण्यात येऊ शकते.
सिलेक्शन कमिटी ऑस्ट्रेलियाविरुद्धची टीम कायम ठेवण्याचीच शक्यता अधिक आहे. टेस्टमधून रिटायरमेंट घेतलेल्या धोनीच्या जागी वृद्धिमान साहा याला विकेटकिपर म्हणून संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.
दुखापतीमुळे यंदाच्या आयपीएलला मुकलेला फास्ट बॉलर मोहम्मद शमी याला टीममध्ये संधी मिळण्याबाबत साशंकता आहे. बंगालचा हा पेसर जर अनफिट असेल तर त्याच्या जागी मुंबईच्या धवन कुलकर्णीला संधी दिली जाते का? हे पहावं लागेल.
ईशांत शर्मा, वरुन एरॉन, उमेश यादव आणि भुवनेश्वर कुमार हा पेस ऍटॅक कायम असेल. तर आर. अश्विन आणि रवींद्र जाडेजा ही फिरकी जोडी असेल. शिखर धवन, मुरली विजय, लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा ही बॅटींग लाईन-अपही कायम असले.
सुरेश रैनाच्या टेस्ट समावेशाबाबत प्रश्नचिन्ह आहे. कारण ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अखेरच्या टेस्टमध्ये दोन्हीही इनिंगमध्ये तो डकवर आऊट झाला होता. दरम्यान युवी, सेहवाग, झहीर आणि हरभजन यांना या दौऱ्यासाठी संधी देत त्यांना 'सेंड ऑफ' दिला जाण्याच्या चर्चाही आहेत. त्यात कितपत तथ्य आहे हे सिलेक्शननंतर स्पष्ट होईलच.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.