नवी दिल्ली : क्रिकेट वर्ल्डकप २०१५ मध्ये सलग दोन मॅचेसमध्ये विरोधी टीमला धूळ चारणाऱ्या टीम इंडियाचा आत्मविश्वास आता निश्चितच उंचावलाय. त्यामुळेच, की काय टीमचं नेतृत्व करणाऱ्या कॅप्टन विराट कोहलीची कॉलरही ताठ झालेली दिसतेय.
सध्या विराट त्याच्या मैदानावरील आणि मैदानाबाहेरील परफॉर्मन्समुळे चांगलाच चर्चेत आहे. त्यामुळेच की काय, दिवसेंदिवस आपल्या खेळण्याची धार आणखी तेज करणाऱ्या विराटनं 'हॉट सीट' पटकावलेली दिसली.
नुकत्याच, पर्थवर दाखल झालेल्या टीम इंडियामध्ये विराटचा भाव आपोआप वधारलेला दिसला तो त्यानं पटकावलेल्या सीटमुळे... टीम इंडियाच्या बसमध्ये डाव्या बाजुच्या पहिल्याच खिडकीची जागा यावेळी विराटनं पटकावली होती.
या जागेचं वैशिष्ट्य म्हणजे, ही जागा कधीकाळी खास मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची जागा म्हणून ओळखली जायची. कारण, सचिनही मॅचला जाताना बसमध्ये डाव्या बाजुची पहिली सीट पकडून बसायचा.. ही जागा त्याला खूप आवडायची... हे सगल्या टीमलाही माहीत होतं... त्यामुळे, त्याच्या साथीदारांनीही या सीटवर बसायचा प्रयत्न केला नव्हता.
बसमधला हा जागेचा सिलसिला कसा आणि कधी सुरू झाला? हे सांगणं मात्र कठिण आहे. पण, सध्या 'हॉट सीट'वर विराजमान झालेल्या विराटकडून प्रेक्षकांच्या अपेक्षाही तगड्या आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.