डॅनिएल व्हिटोरीचा क्रिकेटला अलविदा

वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धेतील उपविजेत्या न्यूझीलंड संघातील स्पिनर डॅनिएल व्हिटोरी याने मंगळवारी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली.

Updated: Mar 31, 2015, 08:25 PM IST
डॅनिएल व्हिटोरीचा क्रिकेटला अलविदा title=

ऑकलंड : वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धेतील उपविजेत्या न्यूझीलंड संघातील स्पिनर डॅनिएल व्हिटोरी याने मंगळवारी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली.
विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा ऑस्ट्रेलियाने पराभव केला. उपविजेत्या संघाचे आज मायदेशी म्हणजे न्यूझीलंडमध्ये आगमन झाले.

मायदेशी परतल्यानंतर न्यूझीलंडच्या या दिग्गज खेळाडूने आपल्या १८ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करत असल्याचे सांगितले.

'आम्ही वर्ल्ड कप जिंकला असता, तर तो आमच्यासाठी सुवर्णक्षण ठरला असता. आमच्या संघाची कामगिरी खूप उत्तम होती. त्यामध्ये मी समाधानी आहे', असे तो यावेळी म्हणाला. तसेच व्हिटोरीने कर्णधार ब्रेंडन मॅकलम आणि प्रशिक्षक माईक हेसन यांचे आभार मानले. व्हिटोरीचा आयसीसीच्या सर्वोत्तम एकदिवसीय संघातही समावेश करण्यात आला आहे.

व्हिटोरीने एकदिवसीय, कसोटी आणि टी २० मिळून ४४२ सामन्यांमध्ये ७०५ बळी टिपले आहेत. २९५ एकदिवसीय सामन्यात ३०५ विकेट्स, तर ११३ कसोटी सामन्यात ३६२ विकेट घेतल्या आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.